हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामातील दगडाबाई शेळके यांचे योगदान
Author(s): विजय पांडे
Publication #: 2508014
Date of Publication: 07.10.2023
Country: INDIA
Pages: 1-5
Published In: Volume 9 Issue 5 October-2023
Abstract
भारतावर अनेक वर्ष राज्य केल्यानंतर ब्रिटिशांच्या जेव्हा लक्षात आले की भारतावर आपल्याला जास्त काळ राज्य करता येणार नाही तेव्हा त्यांनी आपण भारत सोडल्यानंतर भारत अखंड कसा राहणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले. त्याचाच परिणाम म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली.त्याचबरोबर त्यांनी संस्थानिकांनाही स्वतंत्र निर्णय घेण्याची मुभा दिली. हैदराबादच्या निजामाने स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. त्याला निजामाच्या हैदराबाद संस्थानातील जनतेने विरोध करून भारतात सामील होण्यासाठी निजामविरोधी लढा उभारला. त्यात वेगवेगळ्या वर्गांचा समावेश होता. जसे की शिक्षित, सर्वसामान्य, महिला या होत. महिलांचाही निजामविरोधी लढ्यामध्ये सक्रिय सहभाग राहिलेला दिसून येतो. दगडाबाई शेळके हे एक त्यापैकीच नाव. या शोधनिबंधामध्ये दगडाबाई शेळके यांचे हैदराबाद स्वतंत्रसंग्रामातील योगदान अभ्यासले आहे.
Keywords:
Download/View Count: 183
Share this Article